बांदा : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा बांदा शहर अध्यक्षपदी विक्रांत रामचंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते विक्रांत कदम यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, बांदा शहर अध्यक्ष निलेश नाटेकर, भाजपयुमो तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, जय पटेल, राकेश केसरकर, मन की बात मंडळ अध्यक्ष सिद्धेश महाजन आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी विक्रांत कदम यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी पक्ष वाढीसाठी आणि संघटना आणखी मजबूत बांधणीसाठी प्रयत्न करा. यासाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. बांदा भाजप शहर अध्यक्ष निलेश नाटेकर यांनी या निवडीचे स्वागत करत युवा मोर्चाच्या मदतीने बांदा मंडळ भाजप संघटना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त केला.











