गुहागरमध्ये भाजपाकडून निलेश सुर्वेचे नाव आघाडीवर

 

गुहागर l प्रतिनिधी :राज्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहत आहेत त्यातच अनेक जागांवरती अद्यापही उमेदवार घोषित झाले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा कोणताही उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. महायुतीच्या जागेचं घोंगडं अद्यापही भिजत पडलेलं असून या जागेवरती भारतीय जनता पार्टीकडून दावा सांगण्यात येत होता. मात्र गेले पंधरा दिवसापासून ह्या जागेवरती शिवसेना आपला दावा सांगत आहे.

या दोघांच्या वादामुळे अद्यापही महायुतीकडून कोणत्याही उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यातच काही दिवसापूर्वी ही जागा शिवसेनेला सोडल्याची माहिती मिळाली. मात्र उमेदवार अद्यापही घोषित झालेला नसून या जागेवरती भारतीय जनता पार्टी आग्रही आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपने पूर्वतयारी जोमात केली होती. मात्र अद्यापही त्यांना ही जागा मिळाली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार गुहागरमध्ये कुडाळची पुनरावृत्ती….होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय जनता पार्टीकडून गेली दोन वर्ष ज्यांनी तालुकाध्यक्ष पद भूषविले ते युवा नेतृत्व निलेश सुर्वे यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गुहागरच्या राजकारणात एक नवा ट्विट निर्माण झाला आहे. गुहागरमधील एक तरुण नेतृत्व अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.