सावंतवाडी येथे वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

सावंतवाडी:

येथील सबनीसवाडा परिसरात वास्तव्यास असलेले वृद्ध शंकर महादू उघडे (वय ८८, मूळ रा. मु.पो. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मृत्यू झाला. ही घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, मयत शंकर उघडे हे सन २०११ पासून पॅरेलेसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर ओरोस, कोल्हापूर आणि सावंतवाडी येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. ८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना अचानक लघवीचा त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाइकांनी उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

​याप्रकरणी मयत यांचे नातेवाईक सावळीराम शंकर उघडे (वय ५३, रा. मु.पो. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे; सध्या रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांच्या खबरीवरून सावंतवाडी पोलिसांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५३/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

​घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे, पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.