भाजपाच्या सेवा सप्ताहाला सुरुवात, देवगड बस स्थानकाची सफाई करून शुभारंभ

*भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा पंधरवडा अभियानाचा’ अंतर्गत*

*विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी* यांचा वाढदिवस बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या निमित्त भाजप देवगड मंडळ च्या वतीने १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता देवगड एसटी बस स्थानक संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानाचा शुभारंभ माजी आम. अजित गोगटे, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देवगड बसस्थानक येथे करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा चिटणीस प्रकाश गोगटे, बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, उपाध्‍यक्ष उल्हास मणचेकर,संयोजक योगेश पाटकर, मिडीया प्रमुख संजय तारकर, मंगेश लोके , कोषाध्‍यक्ष राजा वालकर, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, उपनगराध्यक्ष मीताली सावंत, गटनेता शरद ठुकरुल , नगरसेविका आद्या गुमास्‍ते,तन्वी चांदोस्कर, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर, माजी नगरसेवक उमेश कनेरकर, बापु जुवाटकर , विश्‍्वमीत्र खडपकर , गोविंद घाडी , सरफराज शेख , ज्ञानेश्‍्वर खवळे , सुभाष धुरी , गणपत गावकर, नरेश डामरी, प्राजक्ता घाडी, मृणाली भडसाळे,निखिल कोयघाडी बुथ अध्‍यक्ष दिपक शेटगे, योगेश घाडी ,संतोष घाडी , संजय कावले ,भाऊ पारकर , देवगड जामसंडे नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्‍या उपस्थितीत स्वच्छ अभियान संपन्‍न झाले.

यावेळी देवगड आगाराचे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, सहा. वाह. निरीक्षक गंगाराम गोरे, वाहतूक नियंत्रक संजय येरम बबन जाधव, यांनी उपस्थित राहून भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त राबविलेल्या स्वच्छता बसस्थानक स्वच्छता मोहिमेबद्दल गुलाब पुष्प देऊन आभार मानले.