भारूड महोत्सवात रसिकासह ,मान्यवर अभ्यासपूर्ण निवेदनाने भारावले
कणकवली सांप्रदायिक भजन संस्था कणकवली आयोजित भारूड महोत्सव नुकताच नांदगाव कणकवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, संतपरंपरा आणि भारूडाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने अध्यक्ष आणि जेष्ठ बुवा प्रकाश पारकर यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन केले होते, या महोत्सवाला रसिकांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या महोत्सवाच्या निमित्ताने खानोली गावचे सुपुत्र तसेच बाबाराम कदम कनिष्ठ महाविद्यालय, जाकादेवी, रत्नागिरी येथे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. वैभव खानोलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनाने या महोत्सवात रंगत आणली अनेक रसिका सह भजनी बुवा आणि मान्यवर त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने भारावले.
या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सुद्धा उपस्थित होते,प्रा. खानोलकरानी केलेल्या अभ्यास पुर्ण निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा या महोत्सवात प्रा खानोलकर याचा विशेष गौरव करण्यात आला.
भारूड ही केवळ मनोरंजनाची लोककला नसून संतविचार, सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीचा प्रभावी माध्यम म्हणून तिचे विशेष महत्त्व आहे.
या लोकपरंपरेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कलावंत, अभ्यासक आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
प्रा. वैभव खानोलकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यानी केलेला गौरव खानोली गावासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
या प्रसंगी भजनप्रेमी, भारूड कलाकार, सांप्रदायिक भजन संस्थेचे पदाधिकारी, रसिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारूड महोत्सवात आपल्या निवेदनातुन विविध दाखले, आणि भारुड उत्पत्तीसह, भजनाचे महत्व आदी गोष्टी सहजपणे, ओघवत्या वाणीने आणि अभ्यास पुर्ण माहितीतुन सादर करत रसिका सह मान्यवरांच्या मनाचा वेध घेणारे प्रा.वैभव खानोलकर यांच्या सह यशस्वी आयोजनाबद्दल कणकवली सांप्रदायिक भजन संस्थेचे सर्व पदाधिकारी , भारुड सादरीकरण करणारे बुवा आणि या भारूड महोत्सवाचे संकल्पक बुवा प्रकाश पारकर याचे ही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.










