मसुरे | झुंजार पेडणेकर :कोकण कॅन्सर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वडाचापाट ग्रामपंचायत आणि उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ६२ जणांनी तर नेत्र तपासणी शिबिराचा ४२ रुग्णांनी लाभ घेतला. सदर शिबीर वडाचापाट ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये डॉ. आदेश पालयेकर आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था डॉ. गौरी आडेलकर, डॉ. जोशी यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी सभापती राजेंद्र प्रभू देसाई म्हणाले,आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. भविष्यातही असेच आरोग्याला प्राधान्य देणारे विधायक उपक्रम गावात राबवले जातील . सर्व ग्रामस्थांनी नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, ग्रा. सदस्य सोनल मांजरेकर, वेदिका माळकर, विनायक प्रभुदेसाई, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रथमेश पालव, ग्रामस्थ श्रीकांत पाटकर, अभिमन्यू पालव, रामचंद्र कासले, चेतन पाटकर, दीपक मांजरेकर सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच उद्योजक दया देसाई मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते.











