१३ ऑगस्टला आमदार दीपक केसरकरांच्या अध्यक्षतेखाली दोडामार्ग तालुक्याची ‘आमसभा’

दोडामार्ग (प्रतिनिधी):दोडामार्ग तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ‘आमसभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ही सभा महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली असून, आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या सभेमध्ये तालुक्यातील जनहिताचे विविध प्रलंबित विषय, स्थानिक समस्या तसेच सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या सभेस उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.

तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन गट विकास अधिकारी (वर्ग-१), पंचायत समिती दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.