समाजसेवक विनेशभाऊ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी उपक्रम
चिपळूण (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजसेवक विनेशभाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप मुख्यप्रवर्तक यांच्या वतीने पाचवे पर्व लक्षवेधी ठरले आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यासह अन्य ठिकाणांहून तब्बल ४ हजार २२२ राख्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण कोकणातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून जोरदार कौतुक होत आहे.
देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि समाजातील विविध घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या संकल्पनेतून ही राखी संकलन मोहीम हाती घेतली होती. चिपळूण आणि गुहागर या दोन्ही तालुक्यांतील नागरिक, माता-भगिनी, महिला बचत गट, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विनेश भाऊं मोहितेंच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या काही दिवसांत ४ हजार २२२ हजारांहून अधिक राख्या जमा केल्या. जमा झालेल्या या सर्व राख्या सीमाभागात अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना, चिमुकल्या बालकांनी, बहिणींनी बनवलेल्या राख्या रवाना केल्या जाणार आहे. चिपळूण आणि गुहागर मधील बहिणींचे प्रेम आणि सदिच्छा या राख्यांच्या माध्यमातून जवानांपर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेच्या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी सांगितले की, “सीमेवर कुटुंबियांपासून दूर राहून आपले रक्षण करणाऱ्या सैनिक भावांसाठी चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील भगिनींनी मोठ्या मायेने प्रेमाने या राख्या सुपूर्द केल्या आहेत. कोकणच्या बहिणींनी नेहमीच सामाजिक आणि देशप्रेमाच्या कार्यात पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी दिलेल्या या भरघोस प्रतिसादामुळे आमची सामाजिक जबाबदारी अधिक वाढली असून, समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.
देशप्रेमाने प्रेरित असलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. लिटिल चॅम्प्स इंग्लिश स्कूल जानवळे मुख्याध्यापक हेमंत शिरकर ता.गुहागर, मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी रोहित जाधव मुख्याध्यापक ता.चिपळूण, श्री सत्यनारायण मित्रमंडळ, कादवड तांबडवाडी समाज मंदिर नितिन शिगवण ता.चिपळूण येथे विशेष कार्यक्रम उत्तम नियोजन तीन ठिकाणी केल्याबद्दल अभिनंदन पत्र देण्यात आले. देशप्रेमाच्या उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी, विशेषतः शिक्षक विद्यार्थी आणि युवक,महिला,सहभागी झाले होते. उपक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी मेहनत घेतली.
माजी सैनिक संभाजी चव्हाण,सुनील खरात, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, राजेश कोकरे, विजय खरात, साद कडवेकर,जितेंद्र कांबळे ओंकार उदेग,सामाजिक सेवक प्रसाद वनगे, सुधीर मोरे,समीर कदम, नितीन शिगवण,संदीप मोहिते, सुशांत मोहिते, सतीश गजमल, अनिल पिनगे, वैभव मोहिते, विवेक जाधव, राहुल कदम, रेशमा कदम,सुचिता तांबे साहिल तांबे, विशाल मोहिते,महेश मोहिते, उद्योजक हेमंत जाधव, उद्योजक मनोहर मोहिते आदींचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव खाडे, सूत्रसंचालन सचिन पवार, तर छायाचित्रण आकाश मोहिते यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, महिला मंडळे, शैक्षणिक संस्था आणि नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.












