सावंतवाडी नगर परिषदेचे सफाई कामगार धोंडू बरागडे यांचे निधन

सांवतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेचे सफाई कामगार आणि करिवडे भोगटेनगर येथील रहिवासी धोंडू गंगाराम बरागडे (वय ५७) यांचे १० ऑगस्ट रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच करिवडे भोगटेनगर परिसरासह सावंतवाडी नगर परिषद वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धोंडू बरागडे यांनी सावंतवाडी नगर परिषदेच्या सफाई विभागात दीर्घकाळ निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. ते नगर परिषदेचे कर्मचारी बाबू बरागडे यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतील नागरिकांनी तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.