Guhagar Breaking :पाचेरी सडा येथे पाच महिन्यांचा बिबट्या मृतावस्थेत

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील पाचेरी सडा येथील बंद घराच्या पडवीत पाच महिन्यांचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून शव ताब्यात घेतले आहे. दरम्यान उपासमारीमुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.