देवरूख हायस्कूलचे विद्यार्थी प्रिय शिक्षक राहूल सप्रे यांचे निधन

देवरूख (प्रतिनिधी) : 

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख हायस्कुलचे विद्यार्थी प्रिय शिक्षक राहूल रमेश सप्रे यांचे आज गुरूवारी पहाटे दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने विद्यार्थी, शिक्षक, मित्रपरिवार यांच्यामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राहूल सप्रे सर हे अत्यंत शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. आज गुरूवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अकाली निधनाने सप्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची अंत्ययात्रा दु ३ वा. देवधामापुर येथील निवास्थानातून निघणार आहे.