एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रंथालय सेवा अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शनपर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.एस.बाडकर यांनी केले.
ग्रंथपाल सौ.एस.एस.वायंगणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमात ग्रंथालयशास्त्राविषयक ग्रंथाची मांडणी करण्यात आलेली होती.तसेच दुर्मिळ ग्रंथ तुकारामची गाथा,मोरोपंत चरित्र, आणि काव्यविवेचन,यांचाही समावेश करण्यात आलेला होता. तसेच सायंकाळी ३:३० ते ४:३० ग्रंथालय विभागामार्फत NDLI Club अंतर्गत Project Management and Software Project Design हे प्रा.स्वप्निल कदम यांचे वेबिनार आयोजित केलेले होते.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयीन ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक खासदार नारायणराव राणेसाहेब,अध्यक्ष सौ.नीलमताई राणे,उपाध्यक्ष आमदार निलेश राणे,सचिव मत्स्य व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.










