मालवण शहरात फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतिबंधक फवारणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये फॉगिंग मशीनच्या सहाय्याने डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने ही फवारणी करण्यात येत आहे. मालवण शहरात पुढील काही दिवस डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू राहणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी दिली.

मालवण नगर परिषद स्तरावर सातत्याने विविध उपाय योजना सुरू असतात. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगर परिषद माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये फॉगिंग मशीनच्या सहाय्याने डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे.