वेत्ये गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद जाधव यांचे निधन

सावंतवाडी : वेत्ये गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद लक्ष्मण जाधव ( ५१, रा. वेत्ये, जाधववाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, तीन भाऊ, भावजया असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.