देवरूखात लिंगायत समाजरत्न पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

आधार ग्रुप लिंगायत समाज सेवा संस्था संगमेश्वरचा उपक्रम

देवरूख (प्रतिनिधी):

आधार ग्रुप लिंगायत समाज सेवा संस्था संगमेश्वरच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये समाजातील १० वी, १२वी, पदवीधर, स्कॉलरशीप परिक्षा उत्तीर्ण, आयटीआय, विशेष प्राविण्य मिळविलेल्या, उल्लेखनिय कामगिरी केलेल्या आणि इतर परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचा गुणगौरव सोहळा तसेच समाजातील बंधु भगिनींचा “समाजरत्न पुरस्कार” प्रदान समारंभ नुकताच रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह, शाखा देवरुख येथे उत्साहात संपन्न झाला.

या समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर समाजातील भगिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. पुढे मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावर्षी लिंगायत समाजातून कोसुंब येथील जेष्ठ समाज बांधव काशीराम (भाई) महादेव गुरव व शिवणे गावातील यशवंत राजाराम लिंगायत यांची समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, व शाल श्रीफळ देऊन हा पुरस्कार प्रदान करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सत्कार मूर्ती भाई गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कारानंतर विद्यार्थी गौरव सोहळा पार पडला. सन्मानपत्र व भेटावस्तु देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.