सेवाभावीवृत्तीच्या अश्विनी केशव कुबल यांचे अल्प आजाराने निधन

ठाणे _

मालवण तालुक्यातील आचरा पिरावाडी येथील कुबल कुटुंबातील सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या सौ. अश्विनी केशव कुबल यांचे दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता परळ येथील केईएम रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. मुत्यु समयी त्या ६८ वर्षांच्या होत्या. प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या कुबल कुटुंबाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा हसतमुख आणि लोभसवाणे व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या पश्चात पती केशव, मुलगा पराग, एक विवाहित मुलगी, पुतणे, दीर, जावई ,सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ठाणे माजिवाडा येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.