लांजा (प्रतिनिधी) लांजा विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रतापराव माने विद्यालय भांबेड ची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. कौसर असलम वारुणकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून तिची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदरची स्पर्धा नुकतीच पार पडली होती. यामध्ये कु. कौसर वारुणकर हिने उत्कृष्ट वक्तृत्वाचे सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिला शिक्षिका सरिता देसाई यांचे मोलाचे
मार्गदर्शन लाभले
या उल्लेखनीय यशाबद्दल भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेडचे अध्यक्ष गणेश साळुंके, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक मुलाणी सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कु. कौसर असलम वारुणकर व मार्गदर्शक शिक्षिका सरिता देसाई यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.













