गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात रानभाजा व कृषी प्रदर्शन झाले.
यावेळी शरदचंद्र पवार महाविद्यालय सावर्डे च्या कृषी कन्या उपस्थित होत्या.यामध्ये पूर्वा जाधव,अनुष्का काजरोळकर,तन्वी सोलीम,प्रणाली थोरात,सुजाता बेंडबुडे, आदिनी विविध कृषी अवजारे प्रदर्शित केली होती.व माहिती ही दिली.काही कृषीपूरक मॉडेल देखील मांडली होती.व विद्यार्थ्यांना व उपस्थिताना माहिती सांगितली.अनेक प्रचलित तर काही दुर्मिळ रांभाजांची मांडणी करून प्रत्येक भाजीचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदानुसार महत्व पटवून दिले.शेती साठी लागणाऱ्या काही बियाण्यांची व खतांची देखील माहिती कृषी कन्यकांनी दिली.
यावेळी माखजन हायस्कुल च्या हरितसेना व कृषी विभागातर्फे विद्यार्थ्यांनी पण रानभाजा प्रदर्शन केले होते.प्रशालेच्या विद्यार्थ्यांना हरितसेना व कृषी विभाग प्रमुख विठ्ठल भोईर यांनी मार्गदर्शन केले. कृषी कॉलेज् व माखजन हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या रानभाजी प्रदर्शनामुळे उपस्थिताना नवनवीन,दुर्मिळ रानभाजांची ओळख व माहिती मिळाली.
उदघाटन प्रसंगी मा.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी रान भाजा ही आपली अनमोल संपत्ती आहे,जुन्या पिढीला सगळी माहित होती.आजच्या विद्यार्थ्यांनी माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले.शिवाय रानभाजां खूप जीवनसत्वे आढळतात. ,कुपोषण दूर करण्याची खरी ताकद रानभाजां मध्ये असल्याचे सांगितले. यावेळी सहसचिव दीपक शिगवण,सरंद चे उपसरपंच उमेश पवार,पोलीस पाटील नंदन भागवत,तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्वास पवार,प्रभावती गोटेकर,संतोष गोटेकर,मुख्याध्यापक महादेव परब,प्रा अभिजित सुर्वे,रवींद्र पवार,विठ्ठल भोईर,कांचन जंगम,अभिजित सहस्त्रबुद्धे आदिंसह पालक,शिक्षक ,विद्यार्थी व सरंद येथील ग्रामस्थ उपस्थित होते.













