‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’चा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले नेवल आर्किटेक रवीराज नार्वेकर यांचा विशेष सत्कार : रविराज नार्वेकर यांसह भाऊ नार्वेकर, पिंट्या नार्वेकर यांचे केले कौतुक

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर खरारेवाडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’ या भव्य व्यवसाय प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

रवीराज नार्वेकर, पिंट्या नार्वेकर, भाऊ नार्वेकर कुटुंबीयांनी उभारलेल्या या व्यवसायातुन स्थानिक मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या भव्य प्रकल्पातून अनेक रोजगार उपलब्ध होतील. आमचे पाठबळ नेहमीच राहील. व्यवसायाची वाढ होऊन नावलौकिक देशभरात होऊदे अशा शुभेच्छा आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले नेवल आर्किटेक रवीराज नार्वेकर यांचा विशेष सत्कार आमदार निलेश राणे यांनी यावेळी केला.

आमदार निलेश राणे यांनी यावेळी केलेल्या भाषणातून बोट बिल्डिंग व्यवसायातीलही त्यांचा खोलवर असलेला अभ्यास स्पष्टपणे दिसून आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जागा मालक महेश सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर विश्वास गावकर, दीपा सावंत, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, देवेंद्र नाईक, उपतालुकाप्रमुख अतीक शेख, विभाग प्रमुख राजन माणगावकर, पस सदस्य रिया बावकर, खरारे पेंडूर सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, सतीश वाईरकर, माजी सभापती राजेंद्र परब, धामापूर सरपंच मानसी परब, श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट सचिव अमित कुळकर्णी, अनिल सावंत, गजानन सावंत, नाना खोत, केशव सावंत, स्वरूप वाळके, अनिल सरमळकर, गणेश वाईरकर, संदेश नाईक, हर्षद मेस्त्री, विकी चोपडेकर यांसह अन्य मान्यवर, ग्रामस्थ, मित्र परिवार व नार्वेकर कुटुंबिय गौरी नार्वेकर, सावली नार्वेकर यांसह नार्वेकर कुटुंबिय उपस्थित होते. सुप्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनीही उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. पप्या नाईक, परमेश्वर मेस्त्री, बंड्या नांदोसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’च्या माध्यमातून स्थानिक गरज लक्षात घेऊन दर्जेदार फायबर बोटी तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समुद्रात मासेमारी व पर्यटन व्यवसायांसाठी बोटींची मोठी गरज असते. ही गरज स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यासाठी नार्वेकर कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या व्यवसायामुळे स्थानिक मच्छीमारांना तसेच बोट व्यवसायाशी संबंधित ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच अन्य राज्यातूनही प्राप्त मागणीनुसार बोट बांधणी करून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

बोट निर्मितीच्या कामाची पाहणी आमदार राणे यांनी केली. संपूर्ण व्यवसाय प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. मेहनत, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यवसाय उभारण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण धाडस दाखवलात. अशा उपक्रमांना आमचे पाठबळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’च्या माध्यमातून भविष्यात अधिक चांगल्या दर्जाच्या व आधुनिक पद्धतीच्या बोटी तयार करण्याचा मानस यावेळी नार्वेकर कुटुंबीयांनी व्यक्त केला. उपक्रम विस्तारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात अधिकाधिक रोजगार निर्मितीचे आमचे प्रयत्न : आमदार निलेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतिमान विकासासोबतच अधिकाधिक रोजगार निर्मिती यासाठी खासदार नारायण राणे साहेब पालकमंत्री नितेश राणे, माझे व महायुती सरकारचे प्रयत्न आहेत. अनेक ठिकाणी त्यात यश प्राप्त होत आहे. भविष्यातही अनेक रोजगार उपलब्ध होतील. रविराज नार्वेकर व नार्वेकर कुटुंबीय यांनी उभारलेला बाळराजे फायबर अँड बोट बिल्डिंग हा प्रकल्प ही रोजगार देणारा देणार आहे. तरुणांनी अश्या व्यवसाय संधी शोधून त्यात उतरावे. धाडस करावे यश निश्चित मिळेल. राणे साहेब राजकारणात येण्याअगोदर पासून कर भरणारे व्यावसायिक उद्योजक आहेत. याचाही विशेष उल्लेख आमदार निलेश राणे यांनी यावेळी केला.