ताज प्रकल्प मार्गी लागल्याने बांदा मंडल भाजपा युवा मोर्चातर्फे जल्लोष 

महायुती सरकारसह पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार

सावंतवाडी । प्रतिनिधी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बांदा मंडल भाजपा युवा मोर्चाच्यावतीने घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला या प्रकल्पामुळे नवी चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळवून दिली. त्याच दिशेने महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन व रोजगाराला चालना देणारे प्रकल्प येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे आणि विशेषतः सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे युवा मोर्चा बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी यांनी आभार मानले.

तळवणे येथे अलीकडेच झोया मरीन सर्व्हिसेसच्या माध्यमातून बोट बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. लवकरच इतरही काही प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सिद्धेश कांबळी यांच्यासह जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, सरचिटणीस रुपेश पटेकर, शहर अध्यक्ष विकी कदम, रत्नाकर आगलावे, बाळा आकेरकर, आशिष कल्याणकर,जय पटेकर, मनोज सावंत, अक्षय मयेकर, सिद्धेश महाजन, प्रथमेश पडवळ, सचिन गावडे, अमित राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.