अध्यक्षपदी अमोल रेडीज तर सरचिटणीसपदी
दीपक तोरस्कर यांची निवड
संतोष कोत्रे
लांजा -: विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर काण्यात आली असून अध्यक्षपदी अमोल रेडीज तर सरचिटणीसपदी
दीपक तोरस्कर यांची निवड काण्यात आली आहे .
विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी संघटनेची नूतन कार्यकारिण निवडण्यात आली. अध्यक्षपदी अमोल मारुती रेडीज, उपाध्यक्ष म्हणून सुरेश सिताराम , भास्कर खामकर, संतोष श्रीधर चव्हाण, सरचिटणीस म्हणून दीपक तोरस्कर, सहचिटणीस म्हणून राजेश विठोबा बेर्डे, खजिनदार अन्वर रखांगी तर सदस्य म्हणून प्रकाश राजपकर, युवराज हांदे, संजय आयरे, विजय कदम, विवेक काटकर, काशीराम राजापकर, शशिकांत खामकर, अमर खामकर, अजय चव्हाण, दीपक कानसे, संतोष कदम, अमोल कदम, मंगेश जाधव, प्रतीक मांडवकर, उमेश खामकर. इत्यादींची निवड करण्यात आली.
तसेच सल्लागार म्हणून जगदीश राजापकर दिलीप पळसुलेदेसाई. आत्माराम चव्हाण. रवींद्र खामकर, डॉक्टर एस व्ही कदम, सत्यवान खामकर किशोर नारकर .इत्यादींची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले. यापुढे अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.













