कणकवली : ब्रह्माकुमारीज इश्वरीय विश्वविद्यालयात राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात २१ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘विश्व बंधुत्व रक्तदान महाअभियान’ राबवले जात आहे. या राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत कणकवलीत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कणकवलीतील ब्रह्मकुमारीज सेंटर (मारुती मंदिराच्या मागे, जानवली) येथे रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. समाज सेवा प्रभाग आणि ब्रह्मकुमारीज माऊंट आबू (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्या, आपले सहकार्य समाजासाठी अमूल्य ठरेल,” असा संदेश आयोजकांकडून देण्यात आला आहे. या रक्तदान महाअभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून, अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९४२११४७७९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













