निरंकारी संत समागमानिमित्त भोडवाल माजरी स्थानकावर सहा एक्स्प्रेस गाड्यांना तात्पुरता थांबा 

30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी उत्तर रेल्वेचा निर्णय

नवी दिल्ली,  : 79 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने दिल्ली विभागातील भोडवाल माजरी स्थानकावर सहा महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा विशेष थांबा 30 सप्टेंबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहे.

 

या निर्णयानुसार चंदीगड – तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस (12218), तिरुवनंतपुरम नॉर्थ – चंदीगड एक्स्प्रेस (12217), अमृतसर – तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस (12484), तिरुवनंतपुरम नॉर्थ – अमृतसर एक्स्प्रेस (12483), मडगाव – चंदीगड एक्स्प्रेस (12449) तसेच चंदीगड – मडगाव एक्स्प्रेस (12450) या गाड्यांना भोडवाल माजरी स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा देण्यात येणार आहे.

 

गाडी क्रमांक 12218 आणि 12484 या गाड्या सकाळी 11.35 वाजता येऊन 11.37 वाजता सुटतील. गाडी क्रमांक 12217 आणि 12483 या गाड्या सकाळी 7.13 वाजता येऊन 7.15 वाजता प्रस्थान करतील. मडगाव – चंदीगड एक्स्प्रेस (12449) दुपारी 3.14 वाजता येऊन 3.16 वाजता सुटेल, तर चंदीगड – मडगाव एक्स्प्रेस (12450) पहाटे 4.33 वाजता येऊन 4.35 वाजता पुढे रवाना होईल.

 

या विशेष व्यवस्थेमुळे निरंकारी संत समागमासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना रेल्वे प्रवासाची अधिक सोय उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.