संतोष कोत्रे
लांजा -: लांजा तालुका वारकरी आयोजित विशेष श्रावण मास पंढरपूर वारी नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सलग अकराव्या वर्षी आयोजित या श्रावण मास पंढरपूर वारीत सहभागी होत भाविकांनी धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद लुटला.
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी हा आतुरलेला असतो. लांजा तालुका वारकऱ्यांच्या वतीने गेली दहा वर्षे विशेष श्रावण मास पंढरपूर वारी आयोजित केली जाते. यावर्षी अकराव्या वर्षी ही वारी आयोजित करण्यात आली होती.दिनांक १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या या वारीमध्ये विविध अध्यामिक कार्यक्रम, काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, तुळशी अर्चन, कीर्तन, नगर प्रदक्षिणा, हरिपाठ, अध्यात्मिक शंका निरसन, चर्चा सत्र, काल्याचे कीर्तन, असे कार्यक्रम झाले.
यामध्ये रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर, ठाणे, मुंबई, पॆण येथील सुमारे ७५ वारकरी भाविक सहभागी झाले होते.
सदर चा सोहळा सुभाष पवार (मठ),
ह. भ. प. प्रकाश रामाणे (व्हेळ), आणि जेष्ठ वारकरी रमेश घुमे (गवाणे) यांच्या अधीपत्याखाली व ह. भ. प. चंद्रकांत महाराज पवार, यांच्या कुशल नेतृत्वाखाली, आणि अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली पार पडला.यामध्ये पहिले कीर्तन ह. भ. प. मधुकर महाराज शेट्ये ठाणा, दुसरे आणि तिसरे काल्याचे कीर्तन पवार महाराज, वेरवली यांचे झाले. हरिपाठ नेतृत्व, ह. भ.. प. सूर्यकांत माने महाराज, मुंबई यांनी केले.यामध्ये लांजा तालुक्यातील, गवाणे, पुनस, मठ, आसगे, लांजा, इंदवटी, कोंडये, वनगुले, वाकेड, कुडेवाडी, व्हेळ, आरगाव, वेरवली, वेरवली खुर्द, वाकेड, चे वारकरी सहभागी झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष पवार, प्रकाश रामाणे, रमेश घुमे, विष्णू लांजेकर, गणपत माटल, देऊ इंदवटकर, तुळशीराम मोरे, पांडुरंग शिंदे, प्रकाश जाधव. शंकर मसणे, विजय पांचाळ.यांनी अपार मेहनत घेतली. सुभाष पवार यांनी महाप्रसादासाठी २५ हजार रुपये दिले आणि हरिपाठ ग्रंथ वाटप केले.













