सिद्धेश फणसेकर सलग चौथ्या वर्षी कोकण विभाग बॅडमिंटन संघात

रत्नागिरी:- जुवाठी राजापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मुलांच्या संघाने तृतीय विजेतेपद पटकावले या कॉलेजच्या सिद्धेश मंगेश फणसेकर याची कोकण विभाग संघात सलग चौथ्या वर्षी निवड झाली.
रत्नागिरी, सिंधुुदुर्ग,रायगड या कोकण विभागतून एकूण १७ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.या सर्व संघातून गोगटे कॉलेज रत्नागिरी चा मुलांचा संघ कास्य पदक विजेता ठरला.या संघात सिद्धेश फणसेकर, आदित्य शिर्के,शौनक भावे, अथर्व कारेकर, परेश तळेकर, आकाश पालवे,सलील कांबळे यांचा समावेश होता.
यातील सिद्धेश मंगेश फणसेकर ,आदित्य शिर्के यांची राज्य स्पर्धेसाठी कोकण विभाग संघात निवड झाली असून विशेष अभिमानाची बाब म्हणजे सिद्धेश फणसेकर याची कोकण विभाग संघात सलग चौथ्या वर्षी निवड झाली आहे.त्यामुळे तमाम रत्नागिरीकरांकडून सिद्धेश वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.