राजीवडा पुलाजवळ बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील राजीवडा पुलाजवळ बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा.सुमारास करण्यात आली.
हुसेन नाझीम हाकिम (25,रा.धनजीनाका,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल निलेश शिंगवे यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, शुक्रवारी दुपारी संशयित हुसेन हाकिम हा राजीवडा पुलाजवळ बेकायदेशिरपणे मधूर डे मटका जुगाराचे साहित्‍य बाळगून जुगार खेळ चावत असताना ही कारवाई करण्यात आली. त्‍याच्याकडून जुगाराचे साहित्‍य आणि रोख रक्कम असा एकूण 1660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.