खेड | प्रतिनिधी :
गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला शिवसेना खेड तालुका महिला आघाडी आयोजित तालुकास्तरीय ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे आणि महिलांमध्ये एकोपा व आत्मविश्वास वाढविणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध महिला मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून भाग्यलक्ष्मी मंगळागौरी ग्रुप, गुणदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रोख रुपये ३५,०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रुक्मिणीदेवी महिला मंडळ, खेड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना रोख रुपये २५,०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
तर काळकाई कृपा, भरणे जाधववाडी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना रोख रुपये १५,०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण वर्षा भट-बर्वे ( दिवेआगर, श्रीवर्धन) आणि अर्चना जोशी (रत्नागिरी) यांनी केले. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणातील पारंपरिकता, सादरीकरण कौशल्य, वेशभूषा आणि एकूण कलाविष्काराच्या आधारे निकाल जाहीर केला.
कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि उत्कृष्ट सादरीकरणांमुळे ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.यावेळी श्रेया योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे,पंचायत समिती सभापती डॉ आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, जाई आंब्रे, खेड नगराध्यक्ष माधवी बुटाला, सुप्रिया पवार, नेहा दळी, मुग्धा भोसले, सिद्धी शिंदे सर्व शिवसेना नगरसेवक पंचायत समिती सदस्य शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते..













