ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथिल चॅरिटेबल ग्रुप आणि ऑन कॉल रक्तदाता संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मात्र हे शिबीर खऱ्या अर्थाने यशस्वी आणि प्रेरणादायो ठरले ते महिला युवतींच्या सहभागामुळे.भक्ती पनासे तेजल गजानन रासम, आर्या कविटकर यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी या शिबिराचे उदघाटन ओटवणे सरपंच दाजी गांवकर,माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, सगुण गांवकर,गावप्रमुख रविद्र गावकर, संतोष भैरवकर, गजानन रासम, अमेय गावडे,,लुमा जाधव,ग्रा. सदस्य महेश चव्हाण, दिपक गांवकर, स्वप्नील उपरकर, प्रशांत बुराण, विश्वनाथ बोर्ये,अनंत तावडे,प्रभाकर गांवकर, अमित गांवकर, मयूर विठ्ठल गांवकर यांच्या सह ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग सचिव बाबली गवंडे, चॅरीटेबल ट्रस्ट ओटवणे चे जयगणेश गावकर, आरोग्य विभाग कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत या शिबिराला शुभेच्छा दिल्यात. प्रत्यक्ष रक्तदान शिबिराची सुरुवात केली ती भक्ती पनासे, प्रथमेश पनासे या नवविवाहिता जोडीने त्यांनी आपल्या रक्तदानातून प्रेरणादायी संदेश पोचविला यानंतर आर्या नरेंद्र कवीटकर,तेजल गजानन रासम यांनी भिकाजी जाधव,
पंकज गांवकर, ओंकार गांवकर, बाळू गांवकर, बाबल भिसे, मंगेश भिसे, प्रसाद कवीटकर, आनंद भैरवकर, डॉ.अनिकेत कुडाळकर, ज्ञानेश्वर गांवकर, सूरज गांवकर, संतोष भैरवकर, जयगणेश गावकर,
यांनी रक्तदान करून सहकार्य केले आणि शिबीर यशस्वी केले या सर्वांचे ऑन कॉल रक्तदाता संस्था सिंधुदुर्ग आणि चॅरिटेबल ग्रुप ओटवणे यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले त्यांचे आभार मानण्यात आले.













