कांदळगाव येथे उद्या नारळ लढविणे स्पर्धा

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

नारळी पौर्णिमेनिमित्त कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिर परिसरात भाजप-शिवसेना महायुतीतर्फे नारळ लढविणे स्पर्धा गुरुवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ७००१, द्वितीय ४००१, तृतीय २००१, चतुर्थ पारितोषिक १००१ रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी २६

ऑगस्टपूर्वी नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संतोष पारकर-७४९८३९३०४१, योगेश लाड यांच्याशी संपर्क साधावा.