श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे 26 रोजी धार्मिक कार्यक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री सत्यनारायण महापूजा व्रत केले जात असून

२७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व्रत, उपासना, महाआरती अन्नदान आदी कार्यक्रम होणार आहेत.

रात्रौ ठिक ७:४५ वा

श्री देवी भराडी प्रासादिक भजन मंडळ मसदे,ता. मालवण. श्री सत्यनारायण महापूजा व्रतासाठी,श्री स्वामी समर्थ महाराज सेवा म्हणून- यजमान सेवा, अन्नदान, महापुजा प्रसाद, गुप्त दान, पारायण निमित्त , वाढदिवस निमित्त, पितृ स्मरण नांवे अन्नदान, महाप्रसाद मध्ये सहभागी होऊ शकता. उपस्थितीचे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.