दुर्गम जि. प. प्राथमिक शाळा कुंभवडे येथे लोकप्रतिनिधींची भेट; ४ तारखेपर्यंत शिक्षक देण्याचे गणेशप्रसाद गवस यांचे आश्वासन

दोडामार्ग (प्रतिनिधी):
तालुक्यातील अतिशय दुर्गम मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभवडे येथे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विशेष पाहणी दौरा संपन्न झाला. या भेटीदरम्यान शाळेतील प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
​या पाहणी दौऱ्यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस, दादा देसाई, भगवान गवस, नारायण देसाई, विजय गावडे, मधुकर गावडे, सिताराम परब, बाळकृष्ण गावडे यांच्यासह शाळेचे माता-पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. कांबळे यांनी उपस्थितांचे शब्दसुमानांनी स्वागत केले. त्यानंतर शिक्षक श्री. गोरे यांनी प्रास्ताविक सादर करताना शाळेची शैक्षणिक प्रगती तसेच शाळेच्या भौतिक गरजांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

​ शाळेत सध्या शिक्षकांची २ पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्यात यावीत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेला संरक्षक भिंत (कंपाऊंड वॉल) बांधून मिळावी, तळकट-कुंभवडे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, फॉरेस्ट हद्दीतील रस्त्यावर वाढलेली झाडी साफ करून वाहतूक सुरळीत करावी तसेच येत्या
​४ तारखेपर्यंत शिक्षक देण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी अन्य मागण्या बाबत
​ऐकून घेतल्यानंतर उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “येत्या ४ तारखेपर्यंत शाळेत शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल, तसेच कंपाऊंड वॉल, रस्ता खडीकरण-डांबरीकरण आणि रस्त्यावरील झाडी साफ करण्यासह उर्वरित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील,” असे ठोस आश्वासन त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिले.
​लोकप्रतिनिधींनी तात्काळ दिलेल्या या आश्वासनाबद्दल कुंभवडे ग्रामस्थ, माता-पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले आहे.