नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजन
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) येथे लांजा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे माजी उपाध्यक्ष कै. सतीश शंकर राणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा इयत्ता ५वी ते ७वी आणि इयत्ता ८वी ते १०वी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. ५वी ते ७वी गटातील विजेत्यास प्रथम क्रमांकासाठी १,००० रुपये, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ७०० रुपये, चषक व प्रशस्तीपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
तसेच ८वी ते १०वी गटातील विजेत्यास प्रथम क्रमांकासाठी १,५०० रुपये, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकासाठी १,००० रुपये, चषक व प्रशस्तीपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ७०० रुपये, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
तालुक्यातील बुद्धिबळप्रेमी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ऋषिकेश बेर्डे – ९३७३५०५७७३ व चिन्मय भिंगार्डे – ८००७४३४९९८ यांच्याशी संपर्क साधावा.













