८४५ विद्यार्थी चित्रकारांनी आपली कला सादर केली
देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्ष आणि श्रीम. अ. अ. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुख यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर तालुक्यातील १६ शाळांमधील इयत्ता १ली ते इयत्ता १०वीच्या वर्गातील एकूण ८४५ विद्यार्थी चित्रकारांनी आपली कला सादर करून सहभागाची विक्रमी नोंद केली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे, तसेच कला शिक्षक सुरज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा उत्तम प्रकारे पार पडली. या स्पर्धेला संस्थाध्यक्ष व पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक सदानंद भागवत, प्रशालेच्या समिती अध्यक्ष ॲड. वेदा प्रभुदेसाई व सुधीर गावडे यांनी भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. प्रशालेचे सीईओ नितीन शेडगे यांचे स्पर्धेसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण निवृत्त कलाशिक्षक विष्णू परीट व सुयोग पेंढारकर यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
गट अ – इयत्ता १ली आणि २री:- प्रथम- आरवी मोहिते, द्वितीय- भक्ती शिवगण, तृतीय- आर्य मेंगाल.
उत्तेजनार्थ: १. गार्गी किंजळे, २. अवनी केदारी.
गट ब- इयत्ता ३री आणि ४थी: प्रथम- अर्जुन पंडीत, द्वितीय- काव्या शिंदे, तृतीय-सान्वी जागुष्टे.
उत्तेजनार्थ: १.शौर्य इंगळे, २.तन्वी दडस.
गट क – इयत्ता ५वी आणि ६वी प्रथम- जितेश टक्के, द्वितीय- रूही गांधी, तृतीय- स्वप्नजा हुमणे.
उत्तेजनार्थ: १ . सावनी बाईत, २. संकेत साळवी.
गट क्र. ड – इयत्ता ७वी आणि ८वी: प्रथम- महनाज खातून, द्वितीय- इस्मत मन्सूरी, तृतीय- कार्तिकी सप्रे.
उत्तेजनार्थ: १.आयुष चव्हाण, २. अनुष्का जोशी
गट क्र. इ – इयत्ता ९वी आणि १०वी: प्रथम- श्लोक घडशी,द्वितीय- दिया खामकर, तृतीय- गार्गी महाडिक.
उत्तेजनार्थ: १. त्रिवेश बाचम, २. अर्णव पंदेरे.
विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनात प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.













