शिव स्वराज फाऊंडेशनचा ‘एक राखी सैनिकांसाठी’ अभियानाला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 ७ हजार राख्या जवानांसाठी पाठविल्या

लांजा (प्रतिनिधी):  शिव स्वराज फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘एक राखी सैनिकांसाठी’ अभियानाला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून तब्बल ७ हजार राख्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या.
शिव स्वराज फाऊंडेशनच्या वतीने लांजा, रत्नागिरी, चिपळूण आणि मुंबई येथे हा उपक्रम राबविण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या अभियानाच्या माध्यमातून तब्बल ७ हजार राख्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः तयार केलेल्या राख्या सैनिकांना पाठविल्याने उपक्रमाला सामाजिक बांधिलकीसोबतच देशप्रेमाची भावनाही लाभली.

उपक्रमासाठी शिव स्वराज फाऊंडेशनचे चंद्रशेखर धावणे, दिनेश पवार, संदीप परब, संदेश माजळकर, प्रताप पवार, नंदकुमार पाटोळे आणि धर्मेंद्र दाभोळकर यांनी पुढाकार घेतला. तसेच नितीन कदम, सौ. कुलकर्णी,, संध्याताई जंगले आणि शिक्षक
श्री.फणसे यांनी विशेष सहकार्य केले.