देवगडमध्ये नारळी पाैर्णिमा उत्साहात

देवगड : प्रतिनिधी

सागराला नारळ अर्पण करून देवगड तालुक्यात नारळीपाैर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.गुरूवारपासून खाेल समुद्रातील मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.

देवगड येथे तारामुंबरी, मळई, देवगड समुद्रकिनारी भागात नारळीपाैर्णिमा उत्सव माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

देवगड बंदरावर तहसिलदार शीतल जाधव, उद्याेगपती नंदकुमार घाटे, पाेलिस निरिक्षक शाम बुवा, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे, कस्टम निरिक्षक एस्.व्ही.पेडणेकर, प्रविण सावंत,पतन विभागाचे सुमित राेकडे,बंदर विभागाचे मुकूंद खुडे, शिवराम निकम, सतिश खानविलकर तसेच शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक व मच्छिमार आदी उपस्थित हाेते.तहसिलदार शीतल जाधव यांच्या हस्ते शासकीय पुजा करण्यात आली व त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.जामसंडे मळई खाडीकिनारीही बाल मंडळ संगीत मेळा मळईर्ते सागराला नारळ अर्पण करून नारळीपाैर्णिमा साजरी करण्यात आली.मळई खाडीमध्ये मच्छिमारी नाैकांनाही पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली हाेती.

मळईतील ग्रामस्थ मुरारी भाबल यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधीवत पुजा करण्यात आली.त्यानंतर महाआरती,गाèहाणे करून नाैकांमधुन मळई ग्रामस्थ व मच्छिमारांनी सागराला नारळ अर्पण केला.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर,प्रदाेष काेयंडे,जयप्रकाश काेयंडे, रूपेश मणचेकर, सचिन मुणगेकर, अजित काेयंडेे,सुरेश मणचेकर,अनिकेत काेयंडे, नासीर खान, सतिश काेयंडे, बाळकृष्ण राजम, बाळकृष्ण भाबल,सुनील काेयंडे,प्रभाकर काेयंडे,दिलीप काेयंडे, विनाेद काेयंडे,कमलाकर काेयंडे,सचिन झाजम,दीपराज मेस्त्री,महेश पांचाळ,सुदाम काेयंडे, शिवराज काेयंडे, बाळू मेस्त्री,बाबी हिरनाईक,विक्रम बांदकर, सचिन मालंडकर, दत्तात्रय मणचेकर,समीर मेस्त्री, लिलेश मेस्त्री आदी मळई ग्रामस्थ मच्छिमार व महिलावर्ग माेठ्या संख्येने उपस्थित हाेता.

तारामुंबरी येथे सागराला सुवर्णश्रीफळ अर्पण करून नारळीपाैर्णिमा साजरी करण्यात आली.सायंकाळी 5 वाजता तारामुंबरी विठ्ठलमंदीराकडून सुवर्णश्रीफळ व कलशासह भव्य मिरवणुक काढण्यात आली.