वेंगुर्ले येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गोव्यातून ताब्यात..

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई..

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पणजी, गोवा येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला.

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पहिला आरोपी धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेश नगर, कोलवले, गोवा) याचा ठावठिकाणा मिळाला. त्यानुसार पथकाने पणजी येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय सुरेश राठोड, एएसआय डॉमीनिक डिसोझा, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्साल्विस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, महेश्वर समजिस्कर व महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने ही कारवाई केली.