मसुरे | झुंजार पेडणेकर : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल, कट्टा आणि ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल राईडचे आयोजन करण्यात आले.
ही सायकल राईड वराडकर हायस्कूल, कट्टा ते गणेश मंदिर, सावरवाड आणि तेथून पुन्हा गणेश मंदिर, सावरवाड ते वराडकर हायस्कूल, कट्टा अशी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी व सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी ब्युटीज ऑन व्हील्सचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ परब यांनी विद्यार्थ्यांना सायकलिंग, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम व सायकलिंगचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष बापू वराडकर, मुख्याध्यापिका सौ. गावडे, क्रीडा शिक्षक श्री. संजय पेंडूरकर, श्री. भाट, श्री. समीर चांदेरकर, सौ. चांदेरकर, श्री जांभवडेकर शिरोडकर,श्री.वाजंत्री तसेच ब्युटीज ऑन व्हील्सचे निलेश झाट्ये, प्रकाश सरमळकर, सुरेश कांबळी, जगदीश पेंडूरकर, सोनू पारकर, गणेश पारकर, अमित सावंत आणि निलेश हडकर उपस्थित होते.
“निरोगी शरीर, निरोगी मन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली” हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.













