BREAKING: आंगवली लाखणवाडीत रिक्षा पलटी; बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा मृत्यू

निलेश जाधव / देवरूख

👉 संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडीतील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू

👉 आज रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात

👉 बोंड्ये येथील विजय काशिराम चव्हाण (वय-५२) यांचा जागीच मृत्यू

👉 स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच विजय चव्हाण यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र डाँक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले

👉 अपघाताची माहिती समजताच देवरूख पोलीसांनी घटनास्थळी जावून केला पंचनामा

👉 विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्येतील ग्रामस्थ व देवरूखातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात घेतली धाव