शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून अभिनंदन
सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव येथील सिद्धहस्त कलाकार तथा सुप्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
मूर्तिकार विलास मांजरेकर यांचे मूर्तीकलेच्या क्षेत्रात अत्यंत मोठे योगदान आहे. ते आकर्षक गणेश मूर्तींसोबतच इतर विविध प्रकारच्या सुंदर मूर्त्या साकारतात. त्यांच्या या कलाकृतींना केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही मोठी मागणी आहे.
खऱ्या अर्थाने मांजरेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चमकते रत्न आहेत, अशा शब्दांत संजू परब यांनी त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक केले. तसेच मांजरेकर यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटी प्रसंगी माजी नगरसेवक गुरुदास मठकर हे देखील उपस्थित होते.













