चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडच्या तीन छात्रांची अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या “थल सैनिक कॅम्प (TSC) दिल्ली” साठी टीवायबीकॉमचा राज कदम, एसवाय बायोटेकचा श्रेयस मानकर आणि एसवाय डेटा सायन्सचा अथर्व कदम यांची निवड झाली आहे.
“डीबीजे महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच “थल सैनिक कॅम्प” साठी एकाचवेळी तीन छात्रांची निवड झालेली आहे”. एवढेच नव्हे तर गेली सलग तीन वर्षे टीएससी कॅम्प दिल्लीसाठी विद्यार्थ्यांची निवड होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारे १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड या युनिटने यावर्षी स्थल सैनिक कॅम्पची हॅट्रिक साधलेली आहे. आज २९ ऑगस्ट रोजी हे तिन्ही छात्र टीएससी कॅम्प दिल्लीमध्ये सहभागी होण्यासाठी अमरावती येथून प्रयाण करत आहेत. महाविद्यालयाच्या वतीने या तिन्ही छात्रांचे चेअरमन मंगेश तांबे, सेक्रेटरी अतुल चितळे व नियामक समिती सदस्य, प्राचार्य डॉ.माधव बापट, उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयकुमार सिंग, ॲडम ऑफिसर कर्नल के पद्मनाभन तथा सर्व पीआय स्टाफ एनसीसी ऑफिस कराड, मेजर नम्रता माने आणि लेफ्टनंट मधुसूदन माने यांचे या छात्रांना मार्गदर्शन लाभले.













