माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अँड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राण भाज्यांवर आधारित पाक कला स्पर्धा झाल्या.या स्पर्धेचे आयोजन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज तर्फे करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवून आपली खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला.या स्पर्धेत १७ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.यामध्ये अतिका वणू ,समृद्धी शिंदे यांनी बनवलेल्या विविध रान भाज्यांचा पराठा याला प्रथम क्रमांक मिळाला.तर रुपाली शिगवण व अनन्या मते यांनी बनवलेल्या भरंगीच्या पकोड्याना द्वितीय,तर दिव्या घेवडे व सानिका भुवड यांच्या हळदीच्या पानाच्या खिरीला तृतीय क्रमांक मिळालं.स्पर्धे अंती विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी आशिष कदम,रोशन भागडे,पूजा हरचकर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,गौरव पोंक्षे,गौस मुल्ला, ओंकार मुळये, अभिजित सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन सचिन साठे यांनी तर आभार विशाखा धावडे यांनी मानले.











