चिपळूण (वार्ताहर) : कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण संचलित कै. माधवराव बाईत विद्यार्थी वसतीगृह खेर्डी येथे रविवार २० रोजी सकाळी ११ वाजता बहुजनांच्या चळवळीचा विवेकी आवाज, फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत आणि विश्लेषक आदरणीय प्रा. हरी नरके यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. हा आदरांजलीचा कार्यक्रम समविचारी संघटनेचे संघटक विलासजी डिके यांनी आयोजित केला होता.
या शोकसभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्यामकांत गजमल होते. ज्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही त्यांच्यासाठी ‘द ग्रेट भूमिपुत्र’ या फेसबुक पेज वरून लाईव्ह कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अँड. रोशन पाटील, विकी कदम व रमेश जिनगरे उपस्थित होते. त्यांनी प्रा. हरि नरकेंच्या जिवनविषय संघर्षावर माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाला सृष्टी धुलप, नितेश दुर्गोली व वसतीगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमित आदावडे तर प्रस्ताविक विलासजी डिके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. संदिप येलये मानले.












