रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रेशनिंग दुकानदारांचे एकदिवसीय लाक्षणिक बंद आंदोलन

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक / मालक संघटनेच्या वतीने ई-पोस (e-POS) प्रणालीतील सततच्या तांत्रिक बिघाडाला व सर्व्हर डाऊनच्या समस्येला कंटाळून उद्या, दिनांक ०७/०९/२०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून एनआयसीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या यंत्रणेतील वारंवारच्या त्रासामुळे परवानाधारक आणि शिधापत्रिकाधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाकडे वारંवार पाठपुरावा करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. राज्य फेडरेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्हा संघटनेने मंगळवारी झालेल्या बैठकीत या एकदिवसीय लाक्षणिक बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उद्या जिल्ह्यातील सर्व धान्य दुकाने बंद राहून धान्‍य वाटप व्यवस्था एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असून, तांत्रिक अडचणी दूर करून वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.