जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ येथे माझे शब्द माझी गोष्ट वाचन अभियानाला उत्साहात प्रारंभ

गुहागर प्रतिनिधी:
जीवन शिक्षण शाळा गुहागर नंबर एक येथे माझे शब्द माझी गोष्ट वाचन अभियानाला उत्साह पूर्ण वातावरणामध्ये प्रारंभ झाला.
यावेळी रूम टू रीड तालुका समन्वयक राम टेके, गुहागर केंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वसावे, मृणाल झगडे ,संजय आवटे, राजू सुर्वे ,अमोल धुमाळ ईश्वर हलगरे गणेशकर मॅडम जगदाळे मॅडम, ढोणे सर ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तालुका समन्वयक राम टेके यांनी माझे शब्द माझी गोष्ट वाचन अभियाना विषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यावेळी केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील ,मुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी पुस्तकाचे वाचन केले. जीवनामध्ये वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, विद्यार्थ्यांनी दररोज वाचनाचा संकल्प केला. मुख्याध्यापक वसावे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांनी वाचनाशी व्यासंग जोडावा, दररोज अनेक पुस्तकांचे वाचन करावे व आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले. केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांनी वाचनाचे महत्त्व सांगताना वाचाल तर वाचाल, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे या उक्तीची आठवण करून दिली, वाचनाने पुस्तकाने आपले मस्तक चांगले होते, विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या या युगामध्ये नियमित पुस्तके वाचण्याचा संकल्प केला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. त्यावेळी रूम टू रेड तालुका समन्वयक श्रीराम टेके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्री राजू सुर्वे यांनी केले.