देवरूख (प्रतिनिधी):
देवरूखमधील वकील अँड. प्रवीण मांगले यांचे वडील प्रभाकर सदाशिव मांगले यांचे सोमवारी रात्री वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते.
प्रभाकर मांगले हे शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते जैनोन्नती मंडळ, देवरूखचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे सोमवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज मंगळवारी सायंकाळी ५ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.













