गणेशोत्सव काळात राजापूर रत्नागिरी मार्गावरिल फेऱ्यांसह ग्रामीण भागातील राजापूर आगाराच्या २३ बसफेऱ्या रद्द

९ ते १३ सप्टेंबरदरम्यान मुंबई-बोरीवलीकडे जादा वाहतूकीमुळे फेऱ्या रद्दचा निर्णय ग्रामीण भागातील प्रवाशांची होणार गैरसोय
राजापूर प्रतिनिधी : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व बोरीवलीकडून तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राजापूर एसटी आगाराने या मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे दि. ९ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राजापूर आगारातून सुटणाऱ्या काही नियमित बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तशी माहिती आगार प्रशासनाने दिली आहें. मात्र राजापूर रत्नागिरी मार्गावरिल तसेच ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने या कालावधीत ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
आगार प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार रद्द करण्यात आलेल्या फेऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये सकाळी ६.३० – राजापूर–जैतापूर–राजापूर,सकाळी, ६.३० – राजापूर–केळवडे–राजापूर, सकाळी ६.३० – राजापूर–सोगमवाडी–राजापूर,सकाळी ७.४५ – राजापूर–सोलापूर–राजापूर, सकाळी ६.०० व सायंकाळी ५.०० – राजापूर–फुफेरे–राजापूर, सकाळी ८.०० – राजापूर–तुळसापूर–राजापूर, सकाळी ८.३० – राजापूर–रत्नागिरी–रत्नागिरी–राजापूर, सकाळी ८.३० – राजापूर–वाळये–खारेपाटण, सकाळी ८.१० – राजापूर–रत्नागिरी–रत्नागिरी–राजापूर, सकाळी १०.०० – राजापूर–रत्नागिरी–रत्नागिरी–राजापूर, सकाळी ११.०० – राजापूर–रत्नागिरी–रत्नागिरी–राजापूर, सकाळी ११.३० – राजापूर–गावखडी–रत्नागिरी–भालावली (वस्ती), दुपारी १२.१५ – राजापूर–तुळसापूर–राजापूर, दुपारी १२.३० – राजापूर–अणसुरे–राजापूर, दुपारी २.०० – राजापूर–पाचल, सायंकाळी ४.०० – पाचल–ताम्हाणे–पाचल, सायंकाळी ५.०० – पाचल–पांगरी–पाचल, सकाळी ६.४५ – ताम्हाणे–ओणी–राजापूर, दुपारी ३.३० – राजापूर–गावखडी–रत्नागिरी–पाळी–राजापूर, दुपारी २.०० – राजापूर–रत्नागिरी–आंबोळगड (वस्ती), सायंकाळी ४.३० – राजापूर–अणसुरे–राजापूर (वस्ती), सकाळी ८.४५ – राजापूर–चिखलगाव–राजापूर
सायंकाळी ५.०० – राजापूर–नाणार–राजापूर (वस्ती) या गाडयांचा समावेश आहे.
गौरी-गणपतीसाठी मुंबई, बोरीवली तसेच अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान वरील फेऱ्या रद्द असल्याची नोंद घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन राजापूर आगार प्रशासनाने केले आहे.