मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या जादा बसला आरवली नजीक अपघात

एक किरकोळ जखमी तर बाकीच्यांना मुकामार

गौरव पोंक्षे माखजन
मुंबई गोवा महामार्गांवर आरवली नजिक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडी येथे एम एच १४ एम एच ६४५० बस ला जाणाऱ्या एसटी बस ला अपघात झाला.

अपघातात एसटी चे ब्रेक न लागल्याने पुढच्या सोळा टायर ट्रक ला धडक बसली.धडक एवढी भीषण होती की एसटी चा पुढचा भाग पूर्णपणे चकाचूर झाला.यामध्ये मारुती वागनार ला देखील मागून धडक बसली.या अपघातात एस टी तुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दुखापत झाली असून,अन्य प्रवाशांना मुकामार लागला आहे.अपघात ग्रस्त एसटी मुळे एकेरी वाहतूक पुढे सरकत असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या वाहणांची धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे.