दूध उत्पादकांना गणेश चतुर्थीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप!

 ▪️पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेचा उपक्रम 

मसुरे | झुंजार पेडणेकर :

मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोफत भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष सौ. अल्का साठे आणि डॉ. विश्वास साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विश्वास साठे म्हणाले, दूध उत्पादक शेतकरी हा संस्थेचा खरा कणा आहे. रोजच्या कष्टाने आणि निष्ठेने तुम्ही संस्थेला पुढे नेले आहे. सणासुदीच्या काळात तुमच्या या मेहनतीचा यथोचित सन्मान करणे आणि सणाचा आनंद द्विगुणित करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. येणाऱ्या काळातही संस्थेच्या माध्यमातून दुग्ध उत्पादकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा आणि पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी अध्यक्ष सौ. अल्का साठे, डॉ. विश्वास साठे, आबा मसुरकर, सुरेश मापारी, तुळशीदास चव्हाण, हेमंत बागवे, बाप्पा बांदिवडेकर, महमद खान, सुमित सावंत, अनिल वंजारे, मयूर परब, नामदेव पुजारे, सागर मेस्त्री, अमोल धुरी, पोयरेकर, अभि घाडी, मया हिरलेकर, संतोष राणे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.