गणेश शिंदे यांचे कौतुकास्पद कार्य

मिळालेले पाकिट केले परत

गौरव पोंक्षे माखजन:
चिपळूण पाग ते कापसाळ असे सकाळी चालण्यासाठी श्री गणेश सीताराम शिंदे आले असता,कापसाळ येथील रस्त्यावर पाकिट पडलेले दिसले.ते पाकिट त्यानी उचलले तर त्यात ए टी एम,आधार कार्ड,पॅन कार्ड,व पैसे होते.सोबत काही कागदपत्रे होती.गणेश शिंदे यांनी आधारकार्ड वरील मोबाईल वर फोन करत संपर्क साधला.मुंबईला वास्तव्याला असणाऱ्या व गणेशोत्सवाला गावाला आलेल्या नचिकेत अनंत मुंडेकर यांना लागला.आलेल्या फोन वरून पाकिट सापडल्याचे कळल्यावर सुतकेचा निश्वास सोडला.गणेश शिंदे यांनी ओळख पटवत ते पाकिट परत केले.त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी मुळे नचिकेत मुंडेकर यांनी आभार मानले.
गणेश शिंदे हे माखजन इंग्लिश स्कूल चे शिक्षक आहेत.त्याच्या या कृतीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.