रत्नागिरी : दुर्गेश पिलणकर
-
रत्नागिरी शहरातील काजरघाटी धार परिसरात संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
-
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (DB) सापळा रचून एका संशयित इसमाला अटक केली.
-
कारवाईदरम्यान २ किलो १०० ग्रॅम गांजासह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-
ही यशस्वी मोहीम पोलीस उपअधीक्षक आरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेली.
-
अवैध अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या धडक भूमिकेमुळे परिसरातील ड्रग्ज तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.













